सोन्याचा पिंजरा
गेले वर्षभर सतावणारी चिंता, आता पराकोटीला पोहोचली होती.
काहीच क्षणात आम्हाला आमच्या भविष्याची ‘वाट’, कळणार (किंवा ‘लागणार’) होती.
वर्गा मधील, इतर लोकांची अवस्था, केविलवाणी होती.
कारण, होस्टेलमधील ऋणानुबंधांची, आज ताटातूट होणार होती.
एवढ्यात आमचे एक मास्तर वर्गात येतात
आम्हा चौघांना गुपचुप, एल. आय. सी. चे फॉर्म देऊन जातात.
“तुमची नोकरी पक्की!” छुपा संदेश.. असावा का याच्यात?
या सांकेतिक खुणीमुळे , आमचा जीव थोडाफार भांड्यात.
शिंडलरनी कधी अशीच यादी बनवली असावी,
यहुदी जनांची अशीच केविलवाणी अवस्था जाहली असावी.
‘तांबे, नायडू, देशपांडे, पेंढारकर’ .. मास्तरांनी आमची नावे घेतली
सोनेरी पिंजर्याची दारे आमच्यासाठी सताड उघडली
स्वतः ची निश्चिंती झाल्यावर, वाटते इतरांची काळजी,
माणुसकी अन मैत्रीचे कवच पांघरणारे आम्ही, ‘उत्तम रावजी' .
आमच्यात काहीच कर्ते पुरुष, तर काही नशिबाने ‘लकी अली’ ,
नियम वाकविणारर्या काही वशिल्याच्या वल्ली .
यादी बनविणारा, ईश्वर म्हणावा की यमदूत ?
वशिला लावणारा, दगाबाज की कमकुवत ?
सोप्या मार्गाने नोकरी मिळणे हे चांगले का वाईट ?
केवळ काळानेच समजते, श्रम ‘इज आल्वेज राइट’!
सोनेरी पिंजर्याची दारे उघडली, एका वनवासाने . (चौदा वर्षाने)
वाटले, बाहेर पडून भविष्य घडवावे, कष्ट आणि कर्तुत्वाने .
जेव्हा सोनाराच्या कामाची तुलना झाडू वाल्याशी ,
तेव्हा वेळ (कूपमंडूका!!) स्वतःची किंमत ठरविण्याची .
खडतर आयुष्य कणखर बनवते.
हे समजवण्यासाठी काही “क्विक ट्रेनिंग” नसते !
अस्थैर्य हे नैसर्गिक असते.
पाण्यात पडल्याशिवाय का पोहता येते?
No comments:
Post a Comment